Study from Home

◆ विद्युतप्रभार (Electric Charge) :

 

◆ विद्युतप्रभार (Electric Charge) :

● जेव्हा एखाद्या वस्तूवर धनप्रभार ( +) व ऋणप्रभार (-) हे दोन्ही प्रभार समतोल असतात तेव्हा त्या वस्तूवरील निव्वळ प्रभार शून्य असतो. अशा स्थितीत त्या वस्तूला उदासीन म्हणतात. निव्वळ प्रभार शून्य नसल्यास ती वस्तू प्रभारित आहे असे म्हणतात.

◆ एकाच प्रकारच्या प्रभारांमधील बल प्रतिकर्षण स्वरूपाचे असते. तर विरुद्ध प्रकारच्या प्रभारांमधील बल आकर्षण या  स्वरूपाचे असते.

◆ प्रतिकर्षण : एकाच प्रकारचे प्रभार असलेल्या दोन कांड्या एकमेकींना दूर ढकलतात. याला प्रतिकर्षण असे म्हणतात.

◆ आकर्षण : विरुद्ध प्रकारचे प्रभार असलेल्या कांड्या एकमेकांकडे ओढल्या जातात. यालाच आकर्षण असे म्हणतात.

महत्वाचे विद्युत प्रभाराला धनप्रभार (+)

आणि ऋणप्रभार ( -) अशी नावे बेंजामिन फ्रैंकलिन या शास्त्रज्ञाने दिली आहेत.

◆ विद्युतप्रभाराचा उगम : सर्व पदार्थ हे कणांचे बनलेले असून ते कण अणूंपासून बनलेले असतात. प्रत्येक अणूमध्ये स्थिर धनप्रभारित भाग व चल असा ऋणप्रभारित भाग असतो. दोन्ही प्रभार संतुलित असल्यामुळे अणू हा विद्घुतदृष्ट्या उदासीन असतो.

◆ प्रत्येक अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो कारण त्यातील धन व ऋणप्रभारांचे प्रमाण समान असते.

ऋणप्रभार काही कारणांने कमी झाल्यास अणू धनप्रभारीत होतो.

◆ थेल्स या ग्रीक शास्त्रज्ञाच्या असे लक्षात आले, की राळेचा दांडा (अँबर) लोकरी कापडाने घासला

असता या दांड्याकडे पिसे आकर्षित होतात. अंबरला ग्रीक भाषेत ‘इलेक्ट्रॉन’ असे म्हणतात, म्हणून अँबरच्या या आकर्षण गुणधर्माला ‘इलेक्ट्रिसिटी’ म्हटले गेले. 

थॉमस ब्राउनने या शास्त्रज्ञांने 1646 साली इलेक्ट्रिसिटी’ हे नाव शोधून काढले.

◆ घर्षणविद्युत (Frictional Electricity) :

घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या विदयुतप्रभाराला घर्षण विद्यूत म्हणतात. 

घर्षण झालेल्या ठिकाणीच हा प्रभार त्या वस्तूवर निर्माण होतो. त्यामुळे या विदधुतप्रभाराला स्थितिक विद्यूत असेही म्हणतात. वस्तूवर प्रभार निर्माण होतो तो थोडयावेळे पुरताच टिकतो.

◆ प्रभार नसणाच्या वस्तूंना विदधुतप्रभारित वस्तू आकर्षित करतात. समान विदयुतप्रभारांमध्ये प्रतिकर्षण असते,

तर विरुद्ध विदधुतप्रभारांमध्ये आकर्षण असते. विदयुतप्रभारित वस्तू ओळखण्यासाठी प्रतिकर्षण ही कसोटी वापरली जाते.

◆ कोणताच  प्रभार नसणाच्या किंवा उदासीन वस्तूवर धन व ऋणप्रभारांची संख्या सारखी असते.

* प्रवर्तनाने निर्माण झालेला विदयुतप्रभार, म्हणजेच जवळ असताना निर्माण झालेला विदधुतप्रभार, फक्त

विदधुतप्रभारित वस्तू जवळ असे पर्यंतच टिकू शकतो.

◆ सुवर्णपत्र विद्युतदर्शी (Gold Leaf Electroscope) : 

वस्तूवरील विदयुतप्रभार ओळखण्याचे हे साधे

उपकरण आहे.

◆ सन 1752 मध्ये शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रैंकलिननने वीज हे विद्युतप्रभाराचे रूप आहे असे स्पष्ट केले.

◆ वातावरणातील विद्युतप्रभार (Atmospheric Electric Charge) 

 आकाशात हवा आणि ढग घासले गेले की

 त्यावेळी वर असणारे काही ढग धनप्रभारित, तर खाली असणारे काही ढग ऋणप्रभारित बनतात.

जेव्हा ढगाच्या तळाचा ऋणप्रभार जमिनीवरील प्रभारापेक्षा खूप जास्त होतो तेव्हा ऋणप्रभार जमिनीकडे वाह् लागतो. हे अतिशय जलद गतीने घडते. यालाच वीज चमकणे असे म्हणतात. या वेळी विद्युतप्रवाहामुळे उष्णता, प्रकाश व ध्वनिऊर्जा निर्माण होते.

◆वीज पडणे (Lightning Strike) :

 वीज पडते तेव्हा इमारतीच्या छतावर किंवा झाडाच्या शेंड्यावर प्रवर्तनाने विरुद्ध विद्युतप्रभार निर्माण होतो.

 ढग आणि इमारत यांच्यातील विरुद्ध प्रभारातील आकर्षणामुळे ढगातील प्रभार इमारतीकडे प्रवाहित होतो. यालाच वीज पडणे असे म्हणतात.

◆विजेचे फायदे :

विजेमुळे निर्माण होणारी प्रचंड उष्णता व प्रकाशामुळे हवेतील नायट्रोजन व ऑक्सिजन यांच्यात एक रासायनिक क्रिया होऊन नायट्रोजन ऑक्साइड वायू तयार होतो. हा वायू पावसाच्या पाण्यात मिसळून जमिनीवर येतो व जमिनीला नत्र पुरवून जमीन सुपीक करतो.

● विजेच्या ऊर्जेमुळे हवेतील ऑक्सिजनचे ओझोनमध्ये रूपांतर होते. हा ओझोन वायू सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून आपले सर्व सजीवांचे रक्षण करतो.

◆ तडितरक्षक (Lightning Protector) : ढगातून पडणाऱ्या विजेच्या आघातापासून बचाव करण्यासाठी जे उपकरण वापरतात, त्याला तडितरक्षक म्हणतात.

Leave a Comment