Study from Home

ओळख शास्त्रज्ञांची – भास्कराचार्य द्वितीय

प्राचीन भारतातील थोर शास्त्रज्ञ भास्कराचार्य द्वितीय
भास्कराचार्य दोन होऊन गेले, भास्कराचार्य दुसरा याच्याविषयी माहिती काही प्रमाणात उपलब्ध आहे. तो थोर गणितज्ञ होता. बहुश्रुत होता, त्याचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास होता. त्याला एक मुलगी होती. तिचं नाव होतं लीलावती, तिच्यावर भास्कराचार्याचं खूप प्रेम होते. लीलावतीच्या आयुष्यात लग्नाचा केवळ एकच योग होता अन विशिष्ट मुहुर्तावरच तिचं लग्न व्हायला पाहिजे असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं गेलं. तसं जर झालं नाहीतर ती विधवा होईल असंही सांगण्यात आलं. दुर्दैवाने तिच्या लग्नाचा तो मुहुर्त टळला. भास्कराचार्य खूप दुःखी कष्टी झाला. काय करावे हा प्रश्न उभा राहिला, त्याने मग लीलावतीचा विवाह करायचा नाही असं ठरवलं. मग काय करायचं? तिला त्याने गणित अन ज्योतिषशास्त्राचं ज्ञान दिलं. विविध शास्त्रांचं ज्ञान दिलं. ती देखील विद्वान गणिती झाली.

भास्कराचार्याचा जन्म इ.स. १११४ मधे झाला. त्याने वयाच्या छत्तिसाव्या वर्षी ‘सिध्दान्त शिरोमणी’ हा महत्त्वाचा ग्रंथ लिहिला.
त्याचप्रमाणे त्याचे सूर्य सिध्दांत आणि लीलावती हे दोन ग्रंथ प्रसिद्ध आहेत. भास्कराचार्याच्या काळातही भारतावर मुगलांच्या स्वाऱ्या होत
होत्या. अनेकांनी लिहिलेले महत्त्वाचे ग्रंथ त्यांनी नष्ट केले. धनसंपत्ती, स्त्रिया, मुले अन मुख्य म्हणजे ग्रंथ त्यांनी लुटून न्यावे किंवा नष्ट करावे. भास्कराचार्याचे काही ग्रंथ इंग्रजीमधे तसेच फारसी भाषेत रूपांतरीत झालेले आहेत.

आज गणितातील ज्या काही सूत्रांना मूलभूत समजण्यात येतं ती भास्कराचार्यांनी मांडली होती. पाय हा ३.१४१६६… असतो
असं त्याने लिहून ठेवलंय. आज पाय हा ३.१४२ इतका मानला जातो. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याचबरोबर वर्ग,
वर्गमूळ, घन, घनमूळ हे पण त्यांनी सांगितलंय. शून्य म्हणजे काय हे ही तो जाणत होता. गणिताबरोबर बीजगणित आणि भूमितीविषयी
देखील त्याने आपल्या ग्रंथात लिहिलंय. भास्कराचार्याने ज्योतिषाविषयी सांगताना सर्व ग्रहांची माहिती दिलीय. त्यांची गती, दशा, काळ हेही नमूद करून ठेवलंय. ग्रहण लागतं म्हणजे नक्की काय होतं हेही त्याने दाखवलंय. सूर्यावर चंद्राचे प्रतिबिंब पडले की सूर्यग्रहण लागते, त्याचप्रमाणे चंद्रावर पृथ्वीचं प्रतिबिंब पडलं की चंद्रग्रहण लागतं. आजच्या सारख्या दुर्बिणी त्याही काळात असाव्यात का अशी शंका मनात येते. गुरुत्वाकर्षणाविषयी भास्कराचार्याचा एक श्लोक महत्त्वाचा आहे. मध्याकर्षण तत्त्व असे नाव त्याने गुरुत्वाकर्षणाला दिले होते.
आकृष्टि शक्तिश्च मही तपायत
स्वस्थं गुरु स्वामि मुखं स्व शक्त्या ।।

पृथ्वीमधे आभाळातील इतर लहान सहान वस्तू आकडून घ्यायची शक्ती आहे. त्यामुळे कोणतीही वस्तू वरून खालीच भूमीवर पडते. थोडक्यात न्यूटनच्या पूर्वी ८०० वर्ष अगोदर गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त भास्कराचार्याने मांडलाय. भारतातील वैज्ञानिकांचे विचार
किती प्रगल्भ होते हे यावरून स्पष्ट होतं. इ.स. १११४ मधे जन्मलेला भास्कराचार्य इ. स. ११७६ मधे मरण पावला. या थोर शास्त्रज्ञाचं नाव ‘भास्कर दोन’ एका अंतरिक्षयानाला देऊन भारत सरकारने त्याचा गौरव केलाय.