Study from Home

शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार

 शब्दाला जोडून येणारे अव्यय. उदा. लिहिण्यासाठी, कामामुळे . यांत साठी आणि मुळे ही शब्दयोगी अव्ययें (शब्दाला लागून येणारी अव्ययें) आहेत.            ‘काम’शब्दाला ‘मुळें’ लागण्यापूर्वो ‘काम’.चे ‘कामा’ हें सामान्यरूप होतें. शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वीं आधीच्या शब्दाचें सामान्यरूप करावें लागतें. आणखी उदाहरणें :-           सायंकाळीं मुलें घराकडें गेलीं. घरा हें सामान्यरूप, कडें हें शब्दयोगी अव्यय.शेतकरी दुपारीं झाडाखालीं विश्रांती घेत होता. झाडा (सामान्य रूप ), खालीं ( शब्दयोगी अव्यय )आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे. शाळे (सारू), समोर (श.अ) गुरुजी फळ्याजवळ उभे राहून … Read more

ओळख शास्त्रज्ञांची- आल्फ्रेड नोबेल

मरावे परी कीर्ती रूपे उरावे- आल्फ्रेड नोबेल नोबेल पुरस्कार हा जगातील एक सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो. कोण होता हा नोबेल? त्याच्या नावे हा पुरस्कार का दिलाजातो हे प्रश्न आपोआप उभे राहतात. नोबेल हा एक संशोधक होता. त्याने डायनामाइटचा शोध लावला. काय? डायनामाईट? हा तरमोठा विध्वंसक स्फोटक पदार्थ! आतंकवाद्यांच्या बातमीत या पदार्थाचा उल्लेख येत असतो. असा … Read more

ओळख शास्त्रज्ञांची- बेंझामिन फ्रँकलिन

वीजवाहक उपकरण- बेंझामिन फ्रँकलिन पावसाळ्यात आकाशात काळे ढग जमा होतात. मोट्ठा आवाज होतो. कडकडाट होतो, वीजेचा लखलखाट होतो. ‘म्हातारी दळतेय’ म्हणून त्या कडकडाटाला म्हटलं जाते. आकाशात म्हातारी नसते, मात्र जी काही आवाज करते ती असते वीज. ढग एकमेकांवरआदळतात. त्यांच्या घर्षणामुळे वीज चमकते. वीजेचा गोळा तयार होतो आणि तो जमिनीकडे खूप जोरात झेपावतो. जमिनीत गेल्या खेरीज … Read more

ओळख शास्त्रज्ञांची- सर आयझाक न्यूटन

सामान्यातील असामान्य- सर आयझाक न्यूटन उन्हाळ्यात रात्री अंगणात झोपायला किती मजा वाटते, नाही! हं, गच्चीवर देखील रात्री झोपणारे बरेच जण असतात. रात्री कधीकधी अंथरुणावर पडल्या पडल्या आभाळाकडे सहज लक्ष जातं. तेवढ्यात एखादा तारा निखळतो. सर्रकन खाली जमिनीकडे खूपजोरात झेपावतो. हे असं तारा निखळून खाली पडताना पहाणं, कुणी कुणी अशुभ मानतात. पण तसं काहीही नसतं बरं … Read more

ओळख शास्त्रज्ञांची- दुर्बिणीचा जनक गॅलिलियो

दुर्बिणीचा जनक गॅलिलियो क्रिकेटची मॅच होती. एकाने सोबत दुर्बिण आणली होती. गळ्यात दुर्बिणीचा पट्टा अडकवून तो सारे मैदान पहात होता.मुलांना त्या दुर्बिणीतून कसं दिसतं हे पहाण्याची मोठी हौस होती. मग आळीपाळीने मुलांनी दुर्बिणीतून पाहिलं. किती जवळ दिसतहोते स्टम्प, सारे मैदान लहान वाटत होते. जेथे दुर्बिण फिरवली तो भाग खूप जवळ वाटायचा. या दुर्बिणीचा शोध लावलाय … Read more

ओळख शास्त्रज्ञांची-आर्किमिडिज

युरेका.… युरेका…. आर्किमिडिज ‘काय म्हणतोस, हा मुकुट पूर्णपणे सोन्याचा आहे?’ राजा मुकुटाकडे पहात म्हणाला मुकुट छान दिसत होता. चमकतही होता पण तो पूर्ण सोन्याचाच आहे की काय या विषयी हिरो राजा साशंक होता. आपल्या विजयाचं प्रतीक म्हणून तो एखाद्या देवतेसाठी सोन्याचा मुकुट तयार करून देत असे. मुकुट चांगला व्हावा म्हणून त्याने सोनाराला बोलावून खजिन्यातून सोनं … Read more

ओळख शास्त्रज्ञांची – भास्कराचार्य द्वितीय

प्राचीन भारतातील थोर शास्त्रज्ञ भास्कराचार्य द्वितीयभास्कराचार्य दोन होऊन गेले, भास्कराचार्य दुसरा याच्याविषयी माहिती काही प्रमाणात उपलब्ध आहे. तो थोर गणितज्ञ होता. बहुश्रुत होता, त्याचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास होता. त्याला एक मुलगी होती. तिचं नाव होतं लीलावती, तिच्यावर भास्कराचार्याचं खूप प्रेम होते. लीलावतीच्या आयुष्यात लग्नाचा केवळ एकच योग होता अन विशिष्ट मुहुर्तावरच तिचं लग्न व्हायला पाहिजे असं … Read more