Study from Home

पोषण आणि आहार Diet & Food

   पोषण आणि आहार ● पोषण- सजीवांना ऊर्जा मिळवणे ,वाढ होणे आणि आजारापासून प्रतिकार करणे या कामासाठी पोषणाची आवश्यकता असते.  ही पोषकतत्वे अन्नामधून मिळतात.  कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे ही निराळी पोषकतत्वे आहेत. ● कर्बोदके- कर्बोदके -ही आपल्याला भात पोळी भाकरी आणि तृणधान्य यापासून मिळतात कर्बोदके ही ऊर्जादायी पदार्थ म्हणून कार्य करतात. ● … Read more

वारे व वाऱ्याची निर्मिती

  ◆ वारा  हवेच्या वाहत्या प्रवाहाला वारा म्हणतात. वाऱ्याचा स्पर्श आपल्याला जाणवतो, परंतु आपण वारा पाहू शकत नाही . ◆ वाऱ्याची निर्मिती  पृथ्वीवर हवेचा दाब एक सारखा नसतो.  तो भौगोलिक परिस्थितीनुसार बदलत असतो. जास्त दाबाच्या पट्टयाकडून हवा कमी दाबाच्या पट्ट्याकडे हालचाल करते.  ही हालचाल क्षितिजसमांतर दिशेमध्ये असते. हवेच्या या हालचालीमुळे वाऱ्याची निर्मिती होते. ◆ वाऱ्याची … Read more

यंत्रे प्रकार व कार्य

   यंत्रे दैनंदिन जीवनामध्ये कमी श्रमात आणि कमी वेळेमध्ये जास्त काम करण्यासाठी जी साधने वापरली जातात त्यांना यंत्र म्हणतात.  यंत्र दोन प्रकारची असतात-  साधी यंत्र, गुंतागुंतीची यंत्रे. ◆ साधी यंत्र-  ज्या यंत्रामध्ये एक किंवा दोन भाग आहेत आणि ज्यांची रचना साधी सोपी असते अशा यंत्रांना साधी यंत्र असे म्हणतात. ◆ गुंतागुंतीची यंत्रे  ज्या यंत्रांमध्ये अनेक … Read more

उष्णता ऊर्जा

 उष्णता खालील ठळक मुद्दे काळजीपूर्वक वाचा  1. उष्णता हे ऊर्जेचे एक रूप आहे.  उष्णतेचे संक्रमण म्हणजे उष्णतेचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे, म्हणजेच उष्णतेचे स्थानांतर अथवा स्थलांतर होय. 2. उष्णतेचे संक्रमण हे  वहन, अभिसरण आणि प्रारण या तीन प्रकारे होते. ◆ वहन पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास उष्णतेचे वहन म्हणतात. उष्णता वहनास … Read more

◆ विद्युतप्रभार (Electric Charge) :

  ◆ विद्युतप्रभार (Electric Charge) : ● जेव्हा एखाद्या वस्तूवर धनप्रभार ( +) व ऋणप्रभार (-) हे दोन्ही प्रभार समतोल असतात तेव्हा त्या वस्तूवरील निव्वळ प्रभार शून्य असतो. अशा स्थितीत त्या वस्तूला उदासीन म्हणतात. निव्वळ प्रभार शून्य नसल्यास ती वस्तू प्रभारित आहे असे म्हणतात. ◆ एकाच प्रकारच्या प्रभारांमधील बल प्रतिकर्षण स्वरूपाचे असते. तर विरुद्ध प्रकारच्या … Read more

चला पदार्थ समजून घेऊया

  चला पदार्थ समजून घेऊया पदार्थाच्या तीन अवस्था असतात . स्थायू, द्रव आणि वायू . पाणीसुद्धा तीन अवस्थांमध्ये आढळते.  वाफ ही पाण्याची वायू अवस्था आहे.  पाणी ही पाण्याची द्रव अवस्था आहे. बर्फ ही पाण्याची स्थायु अवस्था आहे. स्थायू पदार्थ – स्थायू पदार्थाला स्वतःचा आकार असतो. त्याला ठराविक आकारमान असते. सपाट पृष्ठभागावर ओतल्यास त्याचा ढीग तयार होतो. … Read more

भारत नदी प्रणाली

 भारत नदी प्रणाली  उगमस्थान व त्यानुसार येणारी इतर वैशिष्ट्ये यांचा विचार करता भारतातील नद्यांचे हिमालयीन नद्या व द्वीपकल्पीय नद्या, असे मुख्यतः दोन प्रकार पडतात. हिमालयीन नद्या हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांचे गंगा नदीप्रणाली, सिंधू नदीप्रणाली आणि ब्रह्मपुत्रा नदीप्रणाली, अशा प्रकारे वर्गीकरण केले जाते.गंगा नदीप्रणाली : अलकनंदा व भागीरथी  यांच्या एकत्रित प्रवाहासच पुढ़े गंगा  नदी म्हणून ओळखले जाते. यांपैकी अलकनंदा ही नदी उत्तर प्रदेश … Read more

भारत- मृदा प्रणाली

  भारत- मृदा प्रणाली  ज्यामध्ये वनस्पतीजीवन समृद्ध होते अशा भूपूष्ठाच्या सर्वांत वरच्या भुसभुशीत थरास मृदा’ असे म्हणतात. मृदा मुख्यतः तळखडकांपासून बनते. मृदा बनण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालू असते. या प्रक्रियेत खडकांचे बारीक-बारीक कणांत रूपांतर होऊन मृदा तयार होत असते. स्थानिक परिस्थितीनुसार या प्रक्रियेत बदल होत असतात. त्या-त्या प्रदेशातील हवामान, तळखडकाचा प्रकार, जमिनीतील पाण्याचा अंश, जमिनीतील वनस्पतीजन्य … Read more

भारत प्राकृतिक रचना 2

 भारत प्राकृतिक 2 गंगा, सिंधू व ब्रह्मपुत्रा यांच्या खोऱ्यांचा सपाट मैदानी प्रदेश या मैदानी प्रदेशाने उत्तरेकडे हिमालय आणि दक्षिणेकडे द्वीपकल्पीय पठार एकमेकांपासून वेगळे केले आहेत. असे म्हणता येईल की, उत्तरेकडे हिमालय पर्वतरांगा व दक्षिणेकडे द्वीपकल्पीय पठार यांच्यामध्ये गंगा, सिंधु, ब्रह्मपुत्रा व त्यांच्या उपनद्यांनी बनविलेला सपाट गाळाचा प्रदेश पसरलेला आहे. या सपाट मैदानी प्रदेशाने जवळजवळ ७ … Read more

भारत प्राकृतिक रचना

 भारत प्राकृतिक रचना  भूस्वरूप यांचा विचार करून भारताचे हिमालयीन पर्वत-प्रदेश, गंगा- सतलज मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, किनारपट्टीचा प्रदेश असे चार प्रमुख प्राकृतिक विभाग पाडले जातात. हिमालयीन पर्वत-प्रदेश हिमालय हा तरुण ‘वली’ पर्वत आहे. सागरतळावरून उचलल्या गेलेल्या वळयांपासून निर्माण झाल्यामुळे यातील खडक प्रामुख्याने स्तरित व रूपांतरित स्वरूपाचे आहेत.  हिमालयाच्या प्रमुख रांगा वायव्येकडील पामीरच्या पठारापासून आग्नेयेकडील सरहद्द प्रदेशापर्यंत … Read more