Study from Home

Our Ideals- Rajarshi Shahu Maharaj

प्रजावत्सल,दलित बंधू ,समतेचे पुरस्कर्ते, सर्वांगीण दृष्टी असलेले कर्ते समाजसुधारक असा ज्यांचा उल्लेख करता येईल असे शाहू महाराज.

शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळचे नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे. 17 मार्च 1884 रोजी कोल्हापूरच्या राजघराण्यात आनंदीबाई राणीसाहेब यांनी त्यांना दत्तक घेतले व शाहू छत्रपती असे त्यांचे नाव ठेवले.2 एप्रिल 1894 रोजी महाराजांनी संस्थानाची अधिकार सूत्रे हाती घेतली . सातव्या एडवर्ड बादशहाच्या राज्यरोहणाच्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी ते इंग्लंडला गेले या प्रवासात त्यांना अनेक अनुभव आले त्यांनी अखिल भारताचा प्रवास करून देशाच्या राजकीय धार्मिक व सामाजिक परिस्थितीचे निरीक्षण केले होते. शाहू महाराजांनी राज्यात शिक्षणाचा प्रसार केला बहुजन समाजाला शिकण्यासाठी सक्रीय मदत दिली.

❇️ वाचनीय पुस्तके pdf स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा*
📖 बटाट्याची चाळ
https://cutt.ly/RDKS9Jd/
📖 झोपाळा
https://cutt.ly/DDKFEhb
📖 बालभारती मराठी कविता
https://cutt.ly/mDKGq87
📖 अमृतवेल
https://cutt.ly/2DKGDwc
📖 पावनखिंड
https://cutt.ly/8DKHhHb

कोल्हापूर शहरात निरनिराळ्या जातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे स्थापन केली.8 सप्टेंबर 1917 रोजी त्यांनी राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याचा आदेश काढला व त्याची अंमलबजावणी केली. सक्तीच्या शिक्षणाची पहिली शाळा चिपरीपेटा येथे सुरू केली. अस्पृश्य भेदभाव त्यांना मान्य नव्हते अस्पृश्यांना शिकण्यास उत्तेजन, नोकरीमध्ये संधी, निरनिराळे व्यवसाय करण्यास प्रोत्साहन, सहभोजन कार्यक्रम व अस्पृश्यता निर्मूलन परिषदांचे आयोजन अशा सर्वांगीण अस्पृश्यता निवारणाचे प्रयत्न केले.

विधवा पुनर्विवाहाचा कायदा (1917) आंतरजातीय विवाहाचा कायदा (23 फेब्रुवारी 1918), बहुजन समाजास नोकऱ्यांमध्ये राखीव जागा, स्त्रियांना क्रूरपणे वागविण्यात प्रतिबंध करणारा कायदा(1919), घटस्फोटाचा कायदा (1920) यासारखे क्रांतीकारक कायदे शाहू महाराजांनीच केले. शाहू महाराजांनी शाहूपुरी येथे गुळाची पेठ वसवली, स्वस्त धान्याची दुकाने उघडली, राधानगरी हे धरण बांधले.

पहिली ते दहावी मराठी माध्यम, सेमी इंग्रजी माध्यम,शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा सराव-अभ्यास*
💎 एका क्लिकवर🖱️
https://www.dnyaneshwarkute.com/2021/10/abhyas-majha.html
🛡️ समी इंग्रजी माध्यम

💎 Class 5 th to 8 th
Semi English Mathematics and Science Online Test
https://www.dnyaneshwarkute.com/p/6-8-semi-english.html
1️⃣ Class 1 st to 4 th with Esaay & Moral stories 👉
https://www.studyfromhomes.com/
3️⃣ Class 9 th & 10 th with Grammar -English ,Marathi & Hindi
https://www.mystudyfromhomes.in/
4️⃣ For Class Seventh Questionnaire
https://abhyasmajha.com/

आपल्या जीवन हयातीत शाहु महाराजांनी प्रत्येक घटकासाठी प्रयत्न केले. महाराजांनी कोल्हापुरात 11 जानेवारी 1918 रोजी सत्यशोधक समाजाची तर 1918 मध्ये आर्य समाजाची शाखा स्थापन केली. शाहू महाराजांचा जन्मदिवस 26 जून, हा दिवस आपण ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून साजरा करतो. 6 मे 1922 रोजी मुंबई येथे शाहू महाराजांचा मृत्यू झाला