Study from Home

August Kranti Din

क्रांती दिवसक्रांती दिवस 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एका महत्त्वपूर्ण घटनेची आठवण करून देतो. 1942 साली महात्मा गांधींनी ‘भारत छोडो’ आंदोलनाची घोषणा केली आणि ब्रिटिश सरकारविरोधात जनतेला उभे राहण्याचे आवाहन केले. या दिवशी, देशभरात आंदोलनाची लाट उसळली आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवीन दिशा मिळाली. या आंदोलनामुळे लाखो भारतीयांनी स्वतःला ब्रिटिश … Read more

Olakh Shastrdnynachi.Jagdishchandra Bosh

वनस्पतीमधे संवेदना शोधणारा भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस पूर्वी भारत हा जगातील सर्वात प्रगत देश होता. या देशात अनेक शोध लागलेले होते. विज्ञान अन गणित या विषयात येथील लोकांनी खूप महत्त्वाचे शोध लावले होते. थोर गणितज्ञ आर्यभट्ट, औषधीशास्त्राचा अभ्यासक चरक, नागार्जुन हा रसायन शास्त्रज्ञ,शल्यतज्ज्ञ सुश्रुत अशी कितीतरी नावे सांगता येतात. ही सर्व विद्वान माणसं फार फार … Read more

Thomas Alva Edison

प्रयोगशाळेसाठी वृत्तपत्र विकणारा थॉमस अल्वा एडिसन ‘पण हे असं का?’ एडिसनने वर्ग शिक्षकाला विचारलं. शिक्षकाने त्याच्या प्रश्नाकडे मुळीच लक्ष दिले नाही. तो नेहमीच असे प्रश्न विचारायचा. एडिसन हटून बसला उत्तरासाठी. शिक्षकाने मग त्याचं नावच काढून टाकलं शाळेतून. नाव काढून टाकताना शेरा मारला की हा मुलगा कमी डोक्याचा आहे, म्हणून. एडिसनची आई शिक्षिका होती तिने त्याला … Read more

ओळख शास्त्रज्ञांची – टेलिफोनचा जनक बेल

हॅलो हॅलो ….. टेलिफोनचा जनक बेल.उन्हाळ्याच्या सुटीत मुलं घरात बसून खूप छान छान खेळ करत असतात. दोन डबे घ्यायचे, लांब, थोडी जाड दोरी घ्यायची. डब्यांना मधोमध खिळ्याने छिद्रं पाडायची, दोरीच्या दोन्ही टोकांना गाठी मारायच्या अन दोन टोकांना दोन डबे बांधायचे म्हणजे दोरीने ओवून घ्यायचे. एक डबा एकाने हातात धरायचा, दुसरा डबा दुसऱ्याने हातात धरून दोरी … Read more

ओळख शास्त्रज्ञांची- राईट बंधूंचं विमान

हे विमान फिरते अधांतरी – राईट बंधूंचं विमान उंच आकाशात उडणाऱ्या विमानांविषयी किती कुतुहल वाटतं, नाही! कसं ते हवेत उडत असेल? त्यात माणसं कशी बसत असतील?ते जमिनीवर कसं उतरत असेल? एक नाही अनेक प्रश्न. विमानाचा आवाज ऐकू आला की लहानमोठे सगळेजण आकाशाकडे वर पाहूलागतात. विमानाचा शोध अशाच कुतुहलातून झालेला आहे. तो विसाव्या शतकाचा सुरूवातीचा काळ … Read more

ओळख शास्त्रज्ञांची- आल्फ्रेड नोबेल

मरावे परी कीर्ती रूपे उरावे- आल्फ्रेड नोबेल नोबेल पुरस्कार हा जगातील एक सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो. कोण होता हा नोबेल? त्याच्या नावे हा पुरस्कार का दिलाजातो हे प्रश्न आपोआप उभे राहतात. नोबेल हा एक संशोधक होता. त्याने डायनामाइटचा शोध लावला. काय? डायनामाईट? हा तरमोठा विध्वंसक स्फोटक पदार्थ! आतंकवाद्यांच्या बातमीत या पदार्थाचा उल्लेख येत असतो. असा … Read more

ओळख शास्त्रज्ञांची- बेंझामिन फ्रँकलिन

वीजवाहक उपकरण- बेंझामिन फ्रँकलिन पावसाळ्यात आकाशात काळे ढग जमा होतात. मोट्ठा आवाज होतो. कडकडाट होतो, वीजेचा लखलखाट होतो. ‘म्हातारी दळतेय’ म्हणून त्या कडकडाटाला म्हटलं जाते. आकाशात म्हातारी नसते, मात्र जी काही आवाज करते ती असते वीज. ढग एकमेकांवरआदळतात. त्यांच्या घर्षणामुळे वीज चमकते. वीजेचा गोळा तयार होतो आणि तो जमिनीकडे खूप जोरात झेपावतो. जमिनीत गेल्या खेरीज … Read more

ओळख शास्त्रज्ञांची- सर आयझाक न्यूटन

सामान्यातील असामान्य- सर आयझाक न्यूटन उन्हाळ्यात रात्री अंगणात झोपायला किती मजा वाटते, नाही! हं, गच्चीवर देखील रात्री झोपणारे बरेच जण असतात. रात्री कधीकधी अंथरुणावर पडल्या पडल्या आभाळाकडे सहज लक्ष जातं. तेवढ्यात एखादा तारा निखळतो. सर्रकन खाली जमिनीकडे खूपजोरात झेपावतो. हे असं तारा निखळून खाली पडताना पहाणं, कुणी कुणी अशुभ मानतात. पण तसं काहीही नसतं बरं … Read more

ओळख शास्त्रज्ञांची- दुर्बिणीचा जनक गॅलिलियो

दुर्बिणीचा जनक गॅलिलियो क्रिकेटची मॅच होती. एकाने सोबत दुर्बिण आणली होती. गळ्यात दुर्बिणीचा पट्टा अडकवून तो सारे मैदान पहात होता.मुलांना त्या दुर्बिणीतून कसं दिसतं हे पहाण्याची मोठी हौस होती. मग आळीपाळीने मुलांनी दुर्बिणीतून पाहिलं. किती जवळ दिसतहोते स्टम्प, सारे मैदान लहान वाटत होते. जेथे दुर्बिण फिरवली तो भाग खूप जवळ वाटायचा. या दुर्बिणीचा शोध लावलाय … Read more