Study from Home

बोधकथा – संपत्तीचा लोभ

 बोधकथा – संपत्तीचा लोभ

एक साधू एका जंगलातून जात होता. जंगलातून जात असताना अचानक त्याला एक मस्तक आणि पोलादी पाय असणारा एक विचित्र माणूस समोर आला. त्या माणसाला बघून साधूला थोड़े आश्चर्यच वाटले. आता पर्यंत या जंगलातून साधूने खूप वेळा भ्रमंती केली होती; पण अशा प्रकारचा माणूस भेटेल, अशी त्याला शंकासुद्धा आली नव्हती. 


कुतूहल म्हणून साधूने त्या माणसाला त्याच्या आहाराविषयी विचारले. यावर तो म्हणाला, मी भूखंड खातो आणि समुद्राचे पाणी पितो. तसा मी अत्यंत सुखी आहे. सर्व भौतिक सुविधा मला उपलब्ध आहेत. माझ्या आहारासाठी मी अनेक भूखंड आरक्षित केलेले आहेत, पण तरीही मला भविष्याची चिंता छळत आहे. 


यावर साधूने विचारले, इतकी सुखं पायाशी लोळत असताना तुला भविष्याची चिंता का बरं? तो माणूस म्हणाला, आज जरी मला प्रचंड जमीन व अमर्याद पाणी उपलब्ध असले तरी हे सारे गिळंकृत केल्यानंतर काय खाऊ? हा प्रश्न मला सतत छळत असतो.



तात्पर्य : माणसाला सत्ता, संपत्ती आणि सन्मान यांचा लोभही असाच अमर्याद असतो, तो आयुष्यभर  संपत नाही.

Leave a Comment