बटाट्याची चाळ – कादंबरी – Pdf
साऱ्या हिंदुस्थानात काही ना काही चळवळी चालू आहेत आणि मुंबई शहराच्या अगदी पोटात असून आपली चाळ थंड असावी याचे बटाट्याच्या चाळीतील सर्व बि-हाडकरूंना एके दिवशी सामुदायिक दुःख झाले. समोरच्या जुठाभाई बिल्डिंग्जमध्ये वर्षातून बारा-बारा अखिल भारतीय पुढाऱ्यांची व्याख्याने व्हावी आणि आपल्या चाळीत भाषण करायला गल्लीचा दादासुद्धा मिळू नये, बाजूच्या चाळीतील भगिनींनी शिशुसप्ताह साजरा करून गव्हर्नरांच्या हस्ते बक्षिससमारंभ घडवून आणावा आणि आपल्याला संक्रांतीच्या हलव्याचे साधे प्रदर्शनसुद्धा भरवता येऊ नये, याचे बटाट्याच्या चाळीतील बंधूंना आणि भगिनींना मनस्वी दुःख झाले. तसे पाहू गेल्यास बटाट्याच्या चाळीत गुणी माणसांना तोटा नव्हता …
पुस्तक Pdf स्वरूपात वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा