Study from Home

यंत्रे प्रकार व कार्य

 

 यंत्रे दैनंदिन जीवनामध्ये कमी श्रमात आणि कमी वेळेमध्ये जास्त काम करण्यासाठी जी साधने वापरली जातात त्यांना यंत्र म्हणतात.

 यंत्र दोन प्रकारची असतात-  साधी यंत्र, गुंतागुंतीची यंत्रे.

◆ साधी यंत्र-

 ज्या यंत्रामध्ये एक किंवा दोन भाग आहेत आणि ज्यांची रचना साधी सोपी असते अशा यंत्रांना साधी यंत्र असे म्हणतात.

◆ गुंतागुंतीची यंत्रे

 ज्या यंत्रांमध्ये अनेक भाग एकमेकांना जोडलेले असतात आणि यामध्ये अनेक प्रक्रिया एकाच वेळी होत असतात अशा क्लिष्ट रचनेच्या यंत्रांना गुंतागुंतीची यंत्र म्हणतात.

आपल्या रोजच्या जीवनात आपण अनेक साधी यंत्र आणि गुंतागुंतीची यंत्र कामाच्या स्वरूपानुसार वेळ आणि श्रम यांचा विचार करून वापरत असतो.

साधी यंत्रे उदाहरण 

उतरण

> वजन उचलण्यासाठी तिरपी ठेवलेली फळी म्हणजे उतरण असते.

> उतरंडीमुळे कमी वजन पेलावी लागते आणि वजन चढणे सोपे जाते.

> उतरणीचा चढाव जेवढा कमी आणि लांब जितकी जास्त तितके वजन कमी जाणावे.

> उतरणीचा चढाव जितका जास्त आणि लांबी जितकी कमी तितके वजन जास्त पेलावे लागते.

> स्क्रू हादेखील उतरणीचा एक प्रकार आहे.

> डोंगरावर जात असताना नागमोडी घाटातील रस्ता हासुद्धा उतरणीचा एक प्रकार आहे.

● ग्रीक वैज्ञानिक आर्किमिडीज यांनी आर्किमिडीज स्क्रू या साध्या यंत्राचा शोध लावला.

● पाचर 

दोन उतरणी जोडून केलेल्या धारदार अवजाराला पाचर म्हणतात.

उदाहरण .कुऱ्हाड, पटाशी, सुरी, खिळा ही सर्व पाचर प्रकारची यंत्रे आहेत.

तरफ-

तरफेचे बल, भार आणि टेकू असे तीन भाग असणाऱ्या लांब पहारी सारख्या अवजाराला तरफ असे म्हणतात. 

तरफेचा दांडा ज्या आधारावर टेकलेला असतो त्याला टेकू असे म्हणतात.

ज्या बला विरुद्ध तरफ कार्य करते त्याला भार असे म्हणतात.

आणि टेकू पासून भारा पर्यंतच्या तरफेच्या बाजूला भार बाजू म्हणतात.

 तरफेच्या दुसऱ्या बाजूने भार उचलण्यासाठी बल लावावे लागते या बाजूला बल बाजू म्हणतात.

◆ तरफेचे प्रकार –

तरफेचे तीन प्रकार पडतात.

हे तिन्ही प्रकार भार ,बल व टेकू यावरून पडतात.

● तरफेचा पहिला प्रकार

ज्या प्रकारांमध्ये मध्ये टेकू व एका बाजूला भार व दुसऱ्या बाजूला बल अशी रचना असते तो पहिला तरफेचा पहिला प्रकार असतो.

उदाहरण – सी सॉ 

● तरफेचा दुसरा प्रकार

या प्रकारामध्ये टेकू एका बाजूला भार मध्यभागी आणि बल दुसऱ्या बाजूला असते तो तरफेचा दुसरा प्रकार असतो.

उदाहरण -बाटलीचे ओपनर

● तरफेचा तिसरा प्रकार- 

मध्यभागी बल ,एका टोकाला टेकू आणि दुसऱ्या टोकाला भार अशी तिसऱ्या प्रकारची तरफ असते.

उदाहरण- चिंता

◆ कप्पी- 

वजन उचलण्यासाठी खाचा असलेले चाक आणि त्यातून टाकलेली दोरी अशी रचना असलेल्या साध्या यंत्राला कप्पी म्हणतात.

कप्पीचा वापर करताना वरच्या दिशेने वजन उचलताना बल खालच्या दिशेने लावावे लागते. यामुळे कप्पी कमी श्रमामध्ये आपले काम करते.

चाक व आस-

दांड्यावर बसवलेले चाक हे सुद्धा साधे यंत्र असते. दांडा हा आस असतो आणि फिरणारे चाक हे त्या आसाभोवती फिरत असते.

◆ यंत्रांची निगा

 यंत्रे योग्य रीतीने वापरता यावी ती खूप काळासाठी टिकावी म्हणून यंत्रांची निगा घेणे आवश्यक असते.

● यंत्रे खराब होण्याची कारणे-

> यंत्रांचा सततचा वापर

> यंत्रावर होणारा हवामानाचा परिणाम

> यंत्रावर धूळ बसणे 

> यंत्राचे काही भाग घासले जाऊन त्याची झीज        होणे.

● यंत्राची निगा

> यंत्रांचे सर्व भाग पुसून ठेवणे.

> यंत्राच्या घासल्या जाणाऱ्या भागावर नियमितपणे तेल किंवा वंगण लावले तर यंत्राची निगा राखता येईल.

> यंत्राच्या भागांचे घर्षण कमी करून त्यांची झीज थांबवल्यामुळे यंत्र खूप काळपर्यंत चांगल्या स्थितीत राहतील.

> यंत्र जेव्हा उपयोगात नसतील तेव्हा झाकून ठेवले पाहिजेत. त्यामुळे त्यावर धूळ बसणार नाही.

> यंत्राच्या धातूच्या भागावर रंग देणे म्हणजेच हवामानाचा त्यावर परिणाम होणार नाही,गंज चढणार नाही.

● यंत्राची योग्य निगा न राखल्यामुळे

जेव्हा आपल्याला यंत्रांची गरज असते तेव्हा ती वापरता येत नाही.

त्यामुळे यंत्राची निगा आपण नियमित राखली पाहिजे.

यंत्र हाताळतांना अपघात होणार नाही याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे.

Leave a Comment