वपूर्झा – कादंबरी pdf
वेणूताई गेल्या आणि यशवंतरावांची जगण्याची इच्छाच नाहीशी झाली होती. यशवंतरावांच्या
डोळ्यांतून अश्रू वाहतच राहिले. कुणीही जिवाभावाचे भेटले, की यशवंतरावांना भावना अनावर होत आणि आसवे ओसंडून जात. यशवंतराव नेहमीच आणि बारकाईने ‘नवा काळ’ वाचत.यशवंतरावांच्या वेणूताई’ अशा मथळ्याचा अग्रलेख आम्ही लिहिला तेव्हा यशवंतरावांचा टेलिफोन आला. ते म्हणाले, ‘वेणूबद्दलचा तुमचा अग्रलेख वाचला. तुम्ही फार मनापासून लिहिला आहे आणि मला मनापासून आवडला!’ त्यांना अधिक बोलताच आले नाही. पतीच्या निधनानंतर पत्नीचे हाय खाऊन जाणे आपल्याला माहीत आहे. पण वेणूताईच्या निधनानंतर जगण्याची इच्छाच नाहीशी होऊन जणू काही सतीच गेलेले यशवंतरावांसारखे पती राजकारणात आम्हाला माहीत नाहीत. किडनीच्या आजाराचे निमित्त झाले इतकेच. त्यांना जायचे होते आणि ते गेले.
पुस्तक Pdf स्वरूपात वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा