Study from Home

भाषाभ्यास – नऊ प्रकारचे रस उदाहरणसह

भाषाभ्यास – नऊ प्रकारचे रस  उदाहरणसह

 १ ) शृंगार रस

–  “दिवा जळे मम व्यथा घेउनी

असशिल जागी तूही शयनी

पराग मिटल्या अनुरागाचे

उसाशांत वेचुनी गुंफुनी”

 २  ) करुण रस

–  “जोवरती हे जीर्ण झोपडे अपुले

दैवाने नाही पडले

तोवरती तू झोप घेत जा बाळा

काळजी पुढे देवाला”

३ ) वीर रस

–  “लाडका बाळ एकुलता फाशीची शिक्षा होता

कवटाळुनि त्याला माता।

अति आक्रोशें, रडते केविलवाणी

भेटेन नऊ महिन्यांनी”

४  ) बीभत्स रस

– ही बोटे चघळत काय बसले हे राम रे लाळ ही

….शी! शी! तोंड अती अमंगळ असे

आधीचं हे शेंबडे

आणि काजळ ओघळे वरूनि हे.

त्यातूनि ही हे रडे।

 5  ) हास्यरस

– आम्ही कोण म्हणूनी काय पुसता,

दाताड वेंगाडूनी

फोटो मासिक, पुस्तकांत न तुम्ही

का आमुचा पाहिला ?

6  ) अद्भूत रस

– “असावा सुंदर चॉकलेटचा बंगला

चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार

पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल”

7  ) भयानकरस

– “ओढ्यांत भालु ओरडती

वाऱ्यात भुते बडबडती

डोहात सावल्या पडती”

 8  ) रौद्र रस

– “पाड सिंहासने दृष्ट ही पालथी ओढ

हत्तीवरूनि मत्त नृप खालती

मुकुट रंकास दे करटि भूपात्रती

झाड खटखट तुझे खड्ग क्षुद्रां

धडधड फोड तट, रूद्र। ये चहुकडे।”

9  ) शांत रस

–  “जे खळांची व्यंकटी सांडो

तया सत्कर्मी रती वाढो

भूतां परस्परे जडो। मैत्र जीवांचे”


वरील घटकावर चाचणी सोडवण्यासाठी  क्लिक करा 

1 thought on “भाषाभ्यास – नऊ प्रकारचे रस उदाहरणसह”

Leave a Comment