बोधकथा – मनःशांती – Moral Story
एका राजाने भगवान बुद्धांना विचारले, आपण कोण? मला आपल्यासारखी मनःशांती लाभेल का? यावर बुद्ध म्हणाले, अवश्य लाभेल. माझे विचार पण खुप दरिद्री होते. माझ्याजवळ खूप काही होतं; पण आत काहीच नव्हतं. जे मला जमलं ते तुला नक्कीच जमेल.
जे एका बीजाला वृक्ष बनवने शक्य आहे, ते दुसऱ्यालाही आहे. प्रत्येक बीजाचा वृक्ष बनू शकतो. तुझाही असाच शांतिवृक्ष बनेल. कारण मनुष्याची आंतरिक शक्ती सारखीच असते ; परंतु तुला त्यासाठी काहीतरी करावं लागेल.
राजा म्हणाला, मी काहीही करण्यास तयार आहे. सर्वसंगपरित्यागसुद्धा करेन. बुद्ध म्हणाले, काही गमावून त्यागून शांती मिळत नाही. स्वत:जवळचे सर्व सोडायला तू सिद्ध आहेस. सोडशीलही; पण तुला शांती मिळणार नाही. जो स्वत:लाच हरवायला तयार असतो, त्यालाच शांती मिळते.
तात्पर्य : स्वत:जवळचे नव्हेतर स्वत:च समर्पित झाल्याशिवाय मन:शांती लाभत नाही.