Study from Home

चला पदार्थ समजून घेऊया

  चला पदार्थ समजून घेऊया

पदार्थाच्या तीन अवस्था असतात .

स्थायू, द्रव आणि वायू .

पाणीसुद्धा तीन अवस्थांमध्ये आढळते.

 वाफ ही पाण्याची वायू अवस्था आहे.

 पाणी ही पाण्याची द्रव अवस्था आहे.

बर्फ ही पाण्याची स्थायु अवस्था आहे.

स्थायू पदार्थ –

स्थायू पदार्थाला स्वतःचा आकार असतो. त्याला ठराविक आकारमान असते. सपाट पृष्ठभागावर ओतल्यास त्याचा ढीग तयार होतो.

 उदाहरण .धातूचे तुकडे, साखर, मीठ.

द्रवपदार्थ-

 द्रवपदार्थ ना स्वतःचा आकार नसतो. ज्यामध्ये ते टाकले जाते तसा आकार त्याला मिळतो. द्रवपदार्थ याला ठराविक आकारमान नसते. ठराविक जागा व्यापतात. सपाट पृष्ठभागावर ओतल्यास सगळीकडे पसरतात व उताराच्या दिशेने वाहतात .

उदाहरण- पाणी ,तेल, दूध.

वायु पदार्थ –

वायु पदार्थाला स्वतः आकार नसतो. उपलब्ध सर्व जागा ते व्यापतात. ठराविक आकारमान सुद्धा नसते. बंद जागेमध्ये दाबाखाली ठेवल्यास त्यांचे आकारमान कमी होते .

उदाहरण -हवा ,वाफ

अवस्थांमधील बदल

 उष्णता दिल्यास ,

स्थायूचा- द्रव,

 द्रवाचा- वायू अवस्थेमध्ये बदल होतो.

 त्याचबरोबर उष्णता काढून घेतल्यानंतर,

 वायूचा- द्रव

 द्रवाचा- स्थायू मध्ये बदल होतो.

तापमापी 

पदार्थाचे तापमान मोजण्यासाठी तापमापी चा वापर केला जातो .

अंश सेल्सिअस हे तापमान मोजण्याचे एकक आहे. हल्ली डिजिटल तापमापी सुद्धा वापरतात .

उत्कलन

उत्कलन म्हणजे उकळणे. द्रवपदार्थ ला उष्णता दिल्यावर दिल्यानंतर त्यांचे बाष्पीभवन होते आणि तापमान वाढत जाते तसे बाष्पीभवनाचा वेग वाढतो आणि ते उकळायला लागते .पाणी उकळत ठेवल्यास 100 डिग्री सेल्सियस तापमानाला वाफेचे बुडबुडे पृष्ठभागावर येतात यालाच पाण्याचे उत्कलन म्हणतात.

 शुद्ध पाण्याचा उत्कलनांक 100 डिग्री सेल्सिअस असतो.

संघनन

 पाण्याची वाफ थंड झाली की त्या वाफेचे पुन्हा पाणी होते याला संघनन म्हणतात .शुद्ध पाण्याचा संघनन बिंदू 100 डिग्री सेल्सिअस असतो .पाण्याचा उत्कलनांक आणि संगणन बिंदू एकच असतो.

गोठण –

द्रवपदार्थाचे स्थायू पदार्थात रूपांतर होणे म्हणजे गोठण होय. ज्या तापमानाला पदार्थाची गोठण होते त्याला त्या पदार्थाचा गोठणबिंदू म्हणतात. पाण्याचा गोठणबिंदू शून्य डिग्री सेल्सिअस आहे. फ्रिजर चे तापमान  – 18 डिग्री सेल्सिअस असते.

विलयन –

स्थायू पदार्थाला उष्णता मिळाल्यानंतर त्याचे पुन्हा द्रवात रूपांतर होते याला विलयन म्हणतात. पाण्याचा गोठणबिंदू आणि विलयबिंदू एकच आहे तो 0 डिग्री सेल्सिअस आहे.

संप्लवन- स्थायू रुपाला उष्णता दिली असता त्याचे द्रव रूपात रूपांतर न होता थेट वायुरूपात अवस्थांतर होते याला संप्लवन असे म्हणतात. उदाहरण. आयोडीन ,कापूर या पदार्थांचे संप्लवन  होते.

◆पदार्थाचे गुणधर्म –

प्रत्येक पदार्थाचे विशिष्ट गुणधर्म असतात.

●ठिसूळपणा – पदार्थाचे लहान कणामध्ये रूपांतर होण्याची क्षमता म्हणजे ठिसूळपणा होय. ●कठीणपणा- दुसऱ्या पदार्थास विरोध करण्याची क्षमता म्हणजे पदार्थाचा कठीणपणा होय. ●स्थितिस्थापकता- ताण किंवा दाब काढल्यास मूळ स्थितीत येण्याची क्षमता म्हणजे पदार्थाची स्थितिस्थापकता होय .

●प्रवाहीता -पदार्थाची सहजपणे वाहण्याची क्षमता म्हणजे प्रवाहिता होय .

●घनता -पदार्थाच्या वस्तुमान यामुळे त्याची घनता ठरते .

●विद्राव्यता – स्थायुच्या विरघळन्याच्या क्षमतेला विद्राव्यता म्हणतात. जे पदार्थ विरघळू शकतात त्यांना विद्राव्य तर जे विरघळू शकत नाही त्यांना अविद्राव्य पदार्थ म्हणतात.

● पारदर्शकता -ज्या पदार्थांमधून आरपार पाहिले जाऊ शकते अशा पदार्थांना पारदर्शक व अशा क्षमतेला पारदर्शकता म्हणतात.

 उदाहरण काच, प्लास्टिक.

◆धातूचे गुणधर्म

● वर्धनीयता -धातूला ठोकून त्याचा हप्ता तयार करता येतो या गुणधर्माला वर्धनीयता असे म्हणतात. ●तन्यता- धातु खेचून त्याची तार करता येते या गुणधर्माला तन्यता असे म्हणतात .

●विद्युत वाहकता- धातूचा विजेचा प्रवाह वाहून नेण्याचा जो गुणधर्म असतो त्याला विद्युत वाहकता असे म्हणतात.

●उष्णता वाहकता -उष्णतेचे वहन करू शकतो म्हणजेच त्यामध्ये उष्णता वाहकता असते. ●नादमयता- एखाद्या धातूवर आघात केल्यास त्यातून नाद येतो या गुणधर्माला नादमयता असे म्हणतात. 

●रंग व चकाकी- प्रत्येकदा धातुला त्याचा विशिष्ट रंग आणि चकाकी असते.

●सर्वात कठीण पदार्थ 

नैसर्गिकरीत्या उपलब्ध असणारा हिरा ,मानव निर्मित व्युरटझाईट ,बोरॉन नायट्राइट आणि धूमकेतू पासून येणारा लॉन्सडाइट हे सर्वात कठीण पदार्थ आहेत.

 हे हिऱ्याहुनही  कठीण असतात.

Leave a Comment