भारत प्राकृतिक 2
गंगा, सिंधू व ब्रह्मपुत्रा यांच्या खोऱ्यांचा सपाट मैदानी प्रदेश या मैदानी प्रदेशाने उत्तरेकडे हिमालय आणि दक्षिणेकडे द्वीपकल्पीय पठार एकमेकांपासून वेगळे केले आहेत. असे म्हणता येईल की, उत्तरेकडे हिमालय पर्वतरांगा व दक्षिणेकडे द्वीपकल्पीय पठार यांच्यामध्ये गंगा, सिंधु, ब्रह्मपुत्रा व त्यांच्या उपनद्यांनी बनविलेला सपाट गाळाचा प्रदेश पसरलेला आहे. या सपाट मैदानी प्रदेशाने जवळजवळ ७ लक्ष चौ. कि. मी. इतके क्षेत्रफळ व्यापलेले आहे. गंगेचे मैदान मुख्यतः उत्तरांचल, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार व पश्चिम बंगाल या राज्यांत येते.यमुना नदीच्या पश्चिम काठावर असलेल्या २०० ते ३०० मीटर इतक्या कमी उंचीच्या डोंगराळ प्रदेशाने गंगेचे मैदान सतलज मैदानापासून वेगळे केले आहे. सतलज मैदानात प्रामुख्याने पंजाब व हरियानातील मैदानी प्रदेश तसेच ‘मरुस्थळी’ व ‘भांगर’ हे राजस्थानमधील सखल प्रदेश येतात. पश्चिमेस हे मैदान राजस्थानच्या वाळवंटात विलीन होते.
गंगेच्या मैदानाच्या पूर्वेस आसाम राज्यात ब्रह्मपुत्रा नदीचा चिंचोळा मैदानी प्रदेश आहे.नदीप्रवाहापासून दूर असलेले प्रदेश पुराच्या गाळाने व्यापलेले आहेत. हा गाळ भांगर’ म्हणून ओळखला जातो, तर नदीप्रवाहाच्या जवळच्या प्रदेशातील गाळ तुलनेने नवीन असून त्याला ‘खादर’ असे म्हटले जाते. खादर प्रकारच्या गाळास पंजाबमध्ये ‘बेत’ असे नामाभिधान आहे. मैदानी भागाच्या दक्षिण सीमेवर चंबळ व शोण नद्यांच्या दरम्यान अतिरिक्त खननातून निर्माण झालेला ‘दुर्भूमी’ म्हणून ओळखला जाणारा प्रदेश आहे. या प्रकारचे भूरूप पंजाब व हरियानातील ‘भाबर’ प्रदेशातही आढळते. या मैदानातील गाळाचे भरण इतके प्रचंड आहे की, १५० ते ३५० मीटर खोलीपर्यंत तळखडक लागत नाही. गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा व त्यांच्या उपनद्यांनी निर्माण केलेले हे विस्तृत मैदान इतके सखल आहे की, कित्येक किलो मीटरपर्यंत कोणताही भू-उठाव नजरेस येत नाही. या मैदानाचा मंद उतार बंगालच्या उपसागराकडे आहे. गंगा व ब्रह्मपुत्रा यांच्या मुखाजवळ ५१,३०६ चौ. कि. मी. इतका विस्तृत असा त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. पश्चिम बंगाल व बांगला देशमध्ये पसरलेला हा त्रिभुज प्रदेश ‘सुंदरबन’ म्हणून ओळखला जातो.
द्वीपकल्पीय पठारी प्रदेश
हा प्रदेश भूकवचाच्या पुरातन भागांपैकी एक असून ही भूमी देशातील सर्वांत प्राचीन म्हणजे ३८० कोटी वर्षापूर्वीची आहे. अनेक प्रकारचे उंचसखल भाग, लहान-मोठ्पया पर्वतरांगा, नद्यांनी तुलनेने अलौकडील काळात निर्माण केलेली खोरी व भरणाची अरुंद मैदाने या सर्वांचा अंतर्भाव या पठारी प्रदेशात होतो. या पठारी प्रदेशात पश्चिम घाट, पूर्व घाट, विध्य, सातपुडा, अरवली यांसारख्या पर्वतरांगा; तसेच छोटा नागपूर, माळवा यांसारखा पठारी प्रदेश समाविष्ट आहे. तापी नर्मदा, कृष्णा, गोदावरी, कावेरी, महानदी यांनी तयार केलेल्या गाळाच्या मैदानांचा व त्रिभुज प्रदेशांचाही यात अंतर्भाव होतो. या द्वीपकल्पीय पठाराचा सर्वसामान्य उतार पूर्वेकडे आहे. सुमारे १६ लक्ष चौ. कि. मी. विस्ताराच्या या पठाराच्या वायव्य सीमेवर अरवली पर्वत आहे. उत्तरेकडे बुंदेलखंडाचे उंचीचे भाग आहेत. कैमूर व राजमहल टेकड्यांनी या पठाराची उत्तर व ईशान्य सीमा व्यापली आहे. पश्चिम घाट व पूर्व घाट यांनी जणू या पठाराच्या पश्चिम व पूर्व सीमा निश्चित केल्या आहेत. या पठाराचा बराचसा भाग ४०० मीटरपेक्षा अधिक उंचीवर आहे. नर्मदा नदीच्या प्रस्तरभंगामुळे या पठाराचे दोन भाग पडले आहेत. यमुना नदी व विंध्य पर्वत यांच्या दरम्यान येणार्या झिजेच्या मैदानाला ‘बुदेलखंड’ म्हणून ओळखले जाते. नरमदेच्या उत्तरेकडील पठारास ‘माळव्याचे पठार’ व दक्षिणेकडील पठारास ‘दख्खनचे पठार’ असे सामान्यतः संबोधले जाते. केरळ राज्यातील ‘अनाईमडी’ (२,६९५ मीटर) हे द्वीपकल्पीय भारतातील सर्वोच्च शिखर आहे.
अरवली पर्वत :
अरवली पर्वतरांगा या भारतातील सर्वांत प्राचीन पर्वतरांगा असून या नैरऋत्य-ईशान्य अशा पसरलेल्या आहेत. उत्तरेकडे या पर्वतरांगांची उंची ४०० मीटरपेक्षाही कमी आहे. गुरुशिखर १,७२२ मीटर हे या पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर होय. मही, लूनी व वनास यांसारख्या नद्या अरवली पर्वतात उगम पावतात. यांपैकी मही व लूनी या नद्या अरबी समुद्रास जाऊन मिळतात, तर वनास नदी चंबळ नदीला जाऊन मिळते.
विध्य पर्वत :
या पूर्व-पश्चिम अशा पसरलेल्या महत्त्वाच्या पर्वतरांगा आहेत. या रांगांद्वारे उत्तरेस असलेले शोण नदीचे खोरे व दक्षिणेस असलेले नर्मदा नदीचे खोरे एकमेकांपासून वेगळे झाले आहे. वरीलपैकी शोण ही नदी पूर्ववाहिनी आहे, तर नर्मदा ही नदी पश्चिमवाहिनी आहे, हेही येथे लक्षात घेण्याजोगे आहे.
सातपुडा पर्वतरांगा :
या रांगा विंध्य पर्वताला समांतर पूर्व-पश्चिम अशा जातात. या रांगांच्या उत्तरेला नर्मदा-खोरे व दक्षिणेला तापी-खोरे आहे. महादेव डोंगररांगा व गावीलगड टेकडया या सातपुडा रांगेच्याच उपरांगा होत. पंचमढी १,३५० मीटर हे सातपुडा पर्वतातील सर्वाधिक उंचीचे ठिकाण होय. सातपुडा पर्वतरांगेचा पूर्वेकडील भाग पुढे ‘मैकल रांग’ म्हणून ओळखला जातो.
छोटा नागपूर पठार :
या पठाराने बिहार राज्याचा दक्षिण भाग व्यापलेला आहे. दगडी कोळशाच्या साठ्यांकरिता प्रसिद्ध असलेल्या या पठाराची सरासरी उंची ७०० मीटरइतकी आहे. दामोदर नदी या पठारावरील महत्त्वाची नदी होय. या पठाराच्या पूर्वेकडील प्रदेशात राजमहल टेकडया येतात.
पश्चिम घाट :
पश्चिम घाटाला ‘सह्याद्री’ म्हणूनही ओळखले जाते. पश्चिम घाट किंवा सहा पर्वतरांगा या पश्चिम किनाऱ्याला समांतर अशा पसरलेल्या आहेत. कळसुबाई १,६४६ मीटर व साल्हेर १,५६७ मीटर ही सह्या पर्वताच्या उत्तर रांगांमधील उंच शिखरे होत. थळघाट व बोरघाट हया या रांगांमधील कोकण व देश यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या खिंडी आहेत. सह्याद्रीचा दक्षिण भूभाग ग्रॅनाइट व पट्टीताष्म (Gneiss) या प्रकारच्या खडकांचा बनलेला आहे. सहयाद्रीच्या दक्षिणेकडील रांगांमध्ये कुद्रेमुख १,८९२ मीटर व पुष्पगिरी १,७९४ मीटर ही उंच शिखरे आहेत. गुडलूरजवळ सह्याद्री व निलगिरीपर्वत एकत्र येतात. ‘दोड्डाबेट्टा’ २,६३७ मीटर हे निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर होय. निलगिरीच्या दक्षिणेस पालघाटची खिंड आहे. या खिंडीमुळे पश्चिम घाटाची सलगता नष्ट झाली आहे. पालघाट खिंडीच्या दक्षिणेला पर्वतरांगा विभागल्या गेल्या आहेत. विभागल्या गेलेल्या या रांगांपैकी उत्तरेकडील रांगेला ‘अन्नमलाई’, ईशान्येकडील रांगेला ‘पलनी टेकडया’ व दक्षिणेकडील रांगेस ‘कार्डमम’ या नावांनी ओळखले जाते.
दख्खनचे पठार :
सातपुडा पर्वत, महादेव डोंगररांगा, पश्चिम घाट व पूर्व घाट यांच्या दरम्यान पसरलेला प्रदेश दख्खनचे पठार म्हणून ओळखला जातो. काही भागांत या पठाराची उंची ४६० मीटर तर काही भागांत कमाल १,२२० मीटर इतकी आहे. लाव्हारसाचे भूपृष्ठावर एकावर एक असे समांतर थर साचून हे पठार बनले आहे. सहय पर्वताच्या काही उपरांगा या पठारी भागात पसरलेल्या आहेत. गोदावरी-खोऱ्याच्या दरम्यान सातमाळा व अजिंठा डोंगररांगा, गोदावरी व भीमा-खोऱ्यादरम्यान हरिश्चंद्रगड व बालाघाट रांगा तर भीमा व कृष्णा यांच्या खोऱ्यांच्या दरम्यान महादेवाचे डोंगर या उपरांगा किनारपट्टीचा प्रदेश
पश्चिमेकडे कच्छच्या रणापासून पूर्वेकडे गंगा-ब्रह्मपुत्रा यांच्या त्रिभुज प्रदेशापर्यंत
भारताच्या मुख्य भूमीस एकूण ६,१०० कि. मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आे. अंदमान, निकोबार व लक्षद्वीप या बेटसमूहांच्या किनाऱ्याचा विचार करता भारतास एकूण ७,५१७ कि. मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. भारताच्या पश्चिमेस असलेला किनारा अरबी समुद्रालगत आहे; तर पूर्वेकडे बंगालच्या उपसागराचा किनारा आहे. मुख्य भूमीच्या दक्षिणेकडे हिंदी महासागराला लागून फारच थोडा असा किनारा आहे.
पूर्व किनारपट्टी :

पश्चिमेकडील किनाऱ्यापेक्षा पूर्वेकडील किनारपट्टीचे मैदान अधिक रुंद आहे. गंगा, ब्रह्मपुत्रा, महानदी, कृष्णा, गोदावरी, कावेरी यांच्या त्रिभुज प्रदेशांमुळे काही ठिकाणी समुद्राच्या दिशेने किनारपट्टीचा विस्तार वाढला आहे. तसेच झीज होऊन पूर्वघाट पाठीमागे जाण्याची क्रिया घडत गेल्यामुळे या किनारपट्टीची रुंदी वाढली आहे. सागरातील वाळूच्या दांड्यांचे भरणाद्वारे पक्क्या जमिनीत रूपांतर झाल्याने मूळात सागराचा भाग असलेली पुलीकत, चिल्का व कोलेरू यांसारखी खाऱ्या पाण्याची सरोवरे या किनाऱ्यावर निर्माण झाली आहेत. तामिळनाडू व श्रीलंका यांचे दरम्यान या किनारपट्टीच्या जवळपास प्रवाळबेटे तयार झाली आहेत.
पश्चिम किनारपट्टी :
पूर्व किनारपट्टीच्या तुलनेत पश्चिम किनारपट्टीचे मैदान बरेचसे अरुंद आहे. मध्य भागात ते विशेष अरुंद असून उत्तरेकडे त्याची रुंदी वाढलेली आहे. दक्षिणेकडे केरळच्या किनाऱ्यावर वाळूच्या भरणातून तयार झालेले दाड व त्यांच्यामागे तयार झालेली खाऱ्या पाण्याची सरोवरे (Back waters) हे या किनारपट्टार एक वैशिष्ट्य आहे. कर्नाटक व महाराष्ट्रात पश्चिम घाटातून लहान-मोठे प्रवाह समुद्राला ।