Study from Home

नैसर्गिक संकटे

 

आपत्ती म्हणजे अचानक आलेले एखादे संकट होय.

 आपत्ती आल्यानंतर राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित आर्थिक आणि सामाजिक हानी होत असते .

आपत्ती या नैसर्गिक आणि मानवनिर्मित असतात.

प्रमुख आपत्ती मध्ये अतिवृष्टी महापूर भूकंप ज्वालामुखी वीज कोसळणे जंगलातील वणवा वाढत्या लोकसंख्येमुळे झालेली गर्दी अविवेकी बांधकाम या सर्व गोष्टी येतात.

काही  भयंकर आपत्ती 

●महाराष्ट्र मध्ये लातूर जिल्ह्यात किल्लारी या गावी 30 सप्टेंबर 1993 रोजी तीव्र भूकंप झाला होता.

● 26 जुलै 2005 रोजी मुंबई व उपनगरे या ठिकाणी अतिवृष्टीमुळे हजारो लोकांचा बळी गेला होता.

● 30 जुलै 2014 रोजी पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्यात माळीन गावात दरड कोसळून संपूर्ण गाव उध्वस्त झाले होते.

● नोव्हेंबर 2015 मध्ये चेन्नई तामिळनाडू येथे अतिवृष्टीमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला होता.

◆काही प्रमुख आपत्ती

● भूकंप

भुगर्भा मध्ये अचानक होणारी कंपनी म्हणजे भूकंप होय यामुळे जमीन थरथर हलते किंवा तिला भेगा पडतात भूकंप झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होत असते आणि या ऊर्जेपासून भूकंप लाटा तयार होतात व त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली हालचाली होतात. 

●भूकंपाचे परिणाम 

भूकंपामुळे बांधकाम पूल रस्ते लोहमार्ग इत्यादी उध्वस्त होतात.

 नद्यांचे प्रवाह बदलतात.

 जीवितहानी, वित्तहानी सुद्धा होते.

●महापूर 

अतिवृष्टीमुळे नदीच्या पात्रामध्ये जास्त पाणी जमा होऊन ते बाहेर पडते .

अतिवृष्टी मुळे गाव शहरातील निचरा व्यवस्था कमी पडते ,गटारे तुंबून पाणी रस्त्यावर पसरते आणि घराघरांमध्ये घुसते.

● महापुराचे परिणाम

 जमिनीची धूप होते .

महापुरामुळे पिकांचे खूप नुकसान होते.

 महापुरामुळे जीवितहानी आणि वित्तहानी होते. पुरानंतर रोगराई आणि आजार पसरतात व सार्वजनिक आरोग्य धोक्यात येते.

●वादळे 

हवेमध्ये कमी जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात व त्यामुळे जोराचा वारा वाहू लागतो.

 या बदललेल्या हवामानामुळे वादळे निर्माण होतात.

 ●वादळाचे परिणाम

 किनाऱ्या जवळील प्रदेशांमध्ये अतोनात नुकसान होते .

जीविताची आणि मालमत्तेची सुद्धा हानी होते. वीजपुरवठा बंद होतो आणि दळणवळण बंद पडते.

●वणवा व आग

 नैसर्गिक आणि नैसर्गिक कारणामुळे जंगल ,गवताळ प्रदेश, कुरणे याठिकाणी जी अनियंत्रित आग लागते तिला वणवा म्हणतात.

●वणव्याचे परिणाम

 वणव्यामुळे सर्व प्राणी आणि वनस्पती हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात .

त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचे प्रचंड नुकसान होते. हवेचे प्रदूषण होते.

◆आपत्ती व्यवस्थापन

 आपत्ती आल्यानंतर तिला तोंड देण्यासाठी जी योजना तयार केली जाते तिला आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात.

 आपत्ती व्यवस्थापन लोकसहभागातून शक्य होते. ●भारतामध्ये 2005 झाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची स्थापना करण्यात आली .

या संस्थेकडून आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात येते.

● आपत्ती व्यवस्थापन संपर्काचे महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक 

पोलीस 100 

अग्निशामक दल 101 

रुग्णवाहिका 102 

आपत्ती नियंत्रण कक्ष 108 किंवा 112

◆आपत्ती येण्यापूर्वी काही दक्षता घेतल्या पाहिजे

 ●रेडिओ आणि टीव्हीवरील बातम्या काळजीपूर्वक ऐकाव्यात.

 ●रेडिओ आणि मोबाईल हे बॅटरीवर चालणारे वापरावेत.

● हवामान खात्याकडून दिलेल्या सूचना ऐकाव्यात. ●www.imd.gov.in ही वेबसाईट नेहमी वापरावी ●आगीपासून बचाव करण्यासाठी अग्निशामक नळकांडी वापरता येणे आवश्यक आहे.

● अतिवृष्टी, दरड कोसळणे यावेळी डोंगराच्या पायथ्याशी आसरा घेऊ नये .

●नदीला पूर असेल तर उंचावर थांबावे वाहत्या पाण्यातून वाहने चालवू नये .

●भूकंप झाला तर प्रवासाचा मार्ग व्यवस्थित आहे का याची खात्री करूनच बाहेर पडावे .

◆प्रथमोपचार 

कोणत्याही आजारावर उपचार मिळण्यापूर्वी तात्काळ आणि तात्पुरती उपाययोजना म्हणजे प्रथमोपचार .

●रक्तस्त्राव होत असलेल्या व्यक्तीला एका जागी बसवावे .

जखम झाली असल्यास जखम पाण्याने स्वच्छ धुवावी आणि हृदयाच्या पातळीपेक्षा जखमी अवयव वर ठेवावा .

●भाजले असल्यास भाजलेला भाग धुवावा व पाण्यात बुडवून ठेवावा.

 पाणी पिण्यास द्यावे, तेलकट मलम लावू नये. कोरड्या ड्रेसिंगने जखम झाकावी.

● उष्माघात झाल्यास रुग्णास सावलीत बसवावे. शरीर थंड पाण्याने पुसावे .

पिण्यास पाणी आणि सरबत द्यावे .

 लवकरात लवकर त्याला दवाखान्यात हलवावे.

●सर्पदंश 

नाग ,मण्यार ,फुरसे ,घोणस ,समुद्र साप याच सापांच्या जाती विषारी असतात.

 विषारी सर्पदंशाने मृत्यू ओढवू शकतो त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.

 साप मारण्यापेक्षा सर्व मित्रांच्या मदतीने सापाला लांब नैसर्गिक अधिवासात सोडावे .

●सर्पदंशावर प्रथमोपचार 

दंश झालेली जागा पाण्याने धुवावी .

सर्पदंश झालेल्या व्यक्तीला धीर द्यावा.

 सर्पदंश झालेल्या जखमेच्या वरच्या बाजूस कपड्याने घट्ट बांधावे.

तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

●कुत्रा चावल्यामुळे रक्तामध्ये विषारी

द्रव्य जाण्याचा धोका असतो .

त्यामुळे जखम पोटॅशियम परमॅग्नेट या द्रावणाने धुवावी .

जखमेवर कोरडे कापड ठेवावे.

 आणि डॉक्टरांकडे नेऊन अँटी रेबीजचे इंजेक्शन द्यावे.

Leave a Comment